सोलापूर : सहा नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत असणाऱ्या आणि महापालिकेच्या 6 सभांना सलग गैरहजर राहणाऱ्या एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांना न्यायालयाने दणका दिला आहे. उच्च न्यायालयात धाव घेऊनही त्यांचे नगरसेवक पद अपात्र ठरवले आहे. न्यायालयाने हा खटला सोलापूर न्यायालयात चालवा, असा आदेश दिला.
न्यायालयाने हा खटला सोलापूर न्यायालयात चालवा असा आदेश दिला. त्याचा निकाल महापालिकेच्या बाजूनी लागून एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. याबाबतची माहिती महापालिकेचे विधिज्ञ श्रीकृष्ण कालेकर यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
न्यायालयात दाद मागितलेल्या तौफिक शेख यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 21 चे नगरसेवक तौफिक इस्माईल शेख हे महानगरपालिकेच्या 6 सभांना लागोपाठ गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याचे मनपा आयुक्तांनी त्यांना नोटीसीने कळवले. त्याला तौफिक शेख यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.