सोलापूर : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सोलापूर जिल्हा हद्दीत सोमवारी दुपारी 1:00 वाजता येणार आहेत. यावेळी खासदार, आमदार, जिल्हा भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख सोलापूर शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी माहिती दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दि. 19 ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्या दिवशी, दि. 20 रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत.
तिसर्या दिवशी दि. 21 रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.
यांच दौऱ्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ही सहभागी असणार आहेत या दोन नेत्यांच्या टेंभुर्णी संयुक्त दौऱ्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करमाळा परांड्याकडे रवाना होतील तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पंढरपूर येथे पूरपरिस्थिती पाहणी दौरा करतील. सायंकाळी मुक्काम सोलापूर येथे मंगळवार, 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:00 ते 11:00 या वेळेत अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांची पाहणी करतील. 11:00 वाजता जिल्हाधिकारी यांच्यासोबत पूर परिस्थितीबाबत जिल्ह्यातील खासदार आमदार पदाधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली 12:00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेनंतर सोयीनुसार पुढे रवाना होते.