सोलापूर : राज्यात सरकार चालवयाला दम लागतो, तो त्यांच्यात नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थिल्लर आहेत, असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. ते सोलापुरात बोलत होते.
अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यात माढा आणि करमाळा तालुक्यातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी अकोला (ता. माढा) येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला.
‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे.आता लोकांना मदतीची गरज आहे, अशा वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याऐवजी त्यांनी हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी.
आम्ही केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत केली होती. आता केंद्राची वाट का? असा सवाल उपस्थित करत अर्थमंत्री अजित पवार हे दिशाभूल करत आहेत, असा आरोप ही त्यांनी केला.
यावेळी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर,आमदार सुभाष देशमुख, आ.विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, चेतन केदार, राजाभाऊ जगदाळे आदीजण उपस्थित होते.
* कर्ज काढा, पण मदत करा : फडणवीस
केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत, असे सांगून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारकडे 60 हजार कोटींचा जीएसटी थकल्याच्या आरोपाचे खंडन केले. राज्यावर 50 हजार कोटींचे कर्ज आहे. आणखी 70 हजार कोटी काढण्याची राज्याकडे क्षमता आहे, असे सांगत कर्ज काढा; पण शेतकऱ्यांना मदत करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.