सोलापूर : केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारनं तात्काळ मदत करावी या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीबद्दल प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, तात्काळ मदत सुरूच आहे. केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. पक्षपात न करता देशाची काळजी घेणं हे केंद्राचं कर्तव्य असल्याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात करुन दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध
बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा राज्यात जर एवढं मोठं संकट आलं आहे, तर सर्वांनी एकजुटीनं केंद्राकडे मदत मागायला हवी,” असा टोलाही उद्धव यांनी लगावला. केंद्र सरकार म्हणजे परदेशातील सरकार नसल्याचे सांगत वेळ पडल्यास मदत मागू, पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पंचनामे झाल्यानंतर मदतीची आवश्यकता वाटली तर हक्काने केंद्राकडे मदत मागणार आहे’, असं ठाकरे यांनी सांगितले.
तसंच, ‘कुणीही राजकीय चिखलफेक करण्याची गरज नाही. सध्या महाराष्ट्रावर मोठे संकट कोसळले आहे. पण, विरोधी पक्ष नेते हे बिहारला प्रचाराला जात आहे. आपल्या राज्यात काय घडते हे पाहून एकत्र येण्याची गरज आहे. जर केंद्राकडे काही मागायचे असेल त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे’, असंही ठाकरे म्हणाले.
राज्यातील कोरोनाचं संकट संपत नाही तेच अतिवृष्टीचं संकट आलं आहे. सोलापूर, मराठवाड्यात मोठं नुकसान झाले आहे. काही दिवसांमध्ये आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे घाईगडबडीने कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दौऱ्यात नुकसानीची पाहणी केली, त्याआधीही प्रशासनाच्या संपर्कात होतो. अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही दिवस आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ही आपत्ती मोठी आहे, पीडितांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. जे जे काही शक्य असेल ती सर्व मदत केली जाईल’, असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी दिले.
* घोषणाबाजी करणार नाही
‘पंचनामे सुरू आहेत, आढावा घेऊन मदत केली जाणार आहे. तुर्तास मृतांच्या नातेवाईंकाना आज प्रातिनिधिक मदत दिली आहे. आतापर्यंत मागील सरकारकडून फक्त घोषणाबाजी करण्यात आली आहे. पण, आम्ही कोणतीही घोषणाबाजी करणार आहे. थेट मदत पुरवणार आहोत, असंही ठाकरे म्हणाले. हे संकट अजून टळलेले नाही. येत्या काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. त्यामुळे घाईगडबडीने काही केले जाणार आहे. सर्वांची काळजी घेण्याची गरज आहे’, असंही ते म्हणाले.
‘