अमरावती 25 जुलै (हिं.स.) महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा परिषद अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धा चे बैठक आयोजन चांदुर बाजार येथील जि आर काबरा महाविद्यालय येथे संपन्न झाली 2024 ते 2025 या वर्षाच्या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा स्पर्धाच्या तालुका, जिल्हा , विभाग, स्तराचे आयोजन विविध स्तरावर बैठक पार पडले या मध्ये आज चांदुर बाजार येथे तालुका क्रीडा स्पर्धा ची बैठक संपन्न करण्यात आली
या क्रीडा स्पर्धेची सुरुवात पुढ्याच्या महिन्यापासून करण्यात येणार असून प्रत्येक खेळाडू नी सराव करण्याचे आव्हान तालुका क्रीडा संयोजक पंकज उईके यांनी या वेळी बोलतांना व्यक्त केले या बैठकीची सुरुवात तालुका क्रीडा क्षेत्रातील मान्यवर यांच्या स्वागताने झाली या कार्यक्रमाला उपस्थित तालुका क्रीडा समिती अध्यक्ष नवले सर , उपाध्यक्ष प्रवीण मोहोड सर, जिल्हा क्रीडा समिती अध्यक्ष नरेंद्र देशमुख,डॉ तुषार देशमुख सचिव तालुका क्रीडा समिती, भगत सर जेष्ठ क्रीडा शिक्षक, इगबाल सर, सुयोग गोरले क्रीडा पत्रकार सर्व क्रीडा मार्गदर्शक ,
तर तालुक्यातील सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते या क्रीडा स्पर्धा मध्ये कबड्डी , खो खो, हॉलीबॉल फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती, मैदानी स्पर्धा , असे विविध प्रकाचे क्रीडा स्पर्धा चे आयोजित करण्यात येणार असून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खेळामध्ये सहभाग घेऊन आपल्या तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावे असे मनोगत या वेळी उईके सर यांनी बोलतांना व्यक्त केले या वेळी सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते