हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी / हर्षदा गावकर
अमरावती, 9 जुलै, (हिं.स.)। माजी खासदार सौ नवनीत राणा व विद्यमान आमदार रवी राणा यांच्या फिनले मिल सुरू करण्याबाबतच्या प्रयत्नांना गती प्राप्त झाली आहे. दिनांक 26 जून रोजी खासदार नवनीत राना व विद्यमान आमदार रविभाऊ राणा यांच्या नेतृत्वात वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंग जी यांना फिनले मिल चे कामगार व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अभय माथने, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य सुधीर, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा रसे मनीष उर्फ छोटू लाडोळे, गिरणी कामगार अध्यक्ष फिनले मिल राजा ठाकूर, उपाध्यक्ष गिरणी कामगार संघ नारायण बोरेकर, सरपंच मल्हारा तथा भाजप कार्यकर्ता तुषार खेरडे, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य गिरीश भोयर, गिरणी कामगार संघ पदाधिकारी समवेत बैठक लावली.
या बैठकीत फिनले मिल लवकरात लवकर सुरू करण्याबाबत नवनीत ताई राणा व रविभाऊ राणा यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांना मागणी केली. रविभाऊ राणा यांनी विधानसभेत सदनात फिनले मिलचा प्रश्न उपस्थित केला व राज्य सरकारने तो चालवायला घ्यावा अशी मागणी माननीय उपमुख्यमंत्री व माननीय मुख्यमंत्री यांना केली. यावेळी विधानसभेत उद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देताना फिनाले मिल बाबत आम्ही सकारात्मक असून फिनले मिल सुरू करण्याकरिता आम्ही महाराष्ट्र शासनाकडून 20 कोटी रुपये अनुदान देण्यास तयार आहोत असे उत्तरात सांगितले. त्यामध्ये माननीय आमदार रवी भाऊ राणा यांना यांना वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून गिरीराज सिंह यांचे पत्र प्राप्त झाले आहे
त्यामध्ये फिनले मिलला प्राधान्य देऊन प्रकर्षाने आपला विषय संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला असून लवकरात लवकर त्यावर कारवाई करण्याचे सांगण्यात आले फिनले मिल हा आदिवासी क्षेत्रातील एकमेव रोजगाराचे साधन असून कच्च्या मालाच्या कमीचे कारण सांगून मिल बंद पाडण्यात आली होती त्यापूर्वीही कोरोना काळात ही मिल बंद पडली होती परंतु गिरणी कामगार सलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने आंदोलन केल्यावर सौ नवनीत राणा व बावनकुळे साहेब यांच्या पुढाकाराने मिल सुरू झाली परंतु नंतर मिल बंद पडल्यावर हा रोजगार सुरू करण्याकरता स्थानिक नेत्यांनी कोणताही प्रयत्न केलेला नाही त्याउलट नवनीत ताई राणा यांनी निवडणूक हरल्यावर सुद्धा मिल सुरू करण्याकरता जे आश्वासन मिल कामगारांना दिले होते त्या आश्वा सणाशी एक निष्ठ राहत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंह जी यांच्याकडे बैठक लावून त्यामध्ये पुढील कारवाई सुरू सुद्धा झाली आहे. यामुळे नवनीत राणा व आमदार रविभाऊ राणा यांचे अचलपूर शहरात सगळीकडे कौतुक होत आहे व उपासमारीमुळे त्रस्त असलेल्या कामगार नवनीतताई राणा रविभाऊ राणा यांच्याकडे आशेने पाहत असून सर्वांना आता त्यांच्याकडून हा रोजगार सुरू करण्याची आशा लागलेली आहे.