नवी दिल्ली, 09 जुलै (हिं.स.) : इंटरनॅशनल ऑर्गत ट्रान्सप्लांट रॅकेट प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज, मंगळवारी एका डॉक्टरसह 7 जणांना अटक केलीय. या रॅकेटचा सूत्रधार बांगलादेशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हे शाखेचे डीसीपी अमित गोयल यांनी सांगितले की, अवयव प्रत्यारोपण प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने 50 वर्षीय डॉक्टरसह 7 जणांना अटक केली आहे. क्राइम ब्रँचच्या म्हणण्यानुसार, या रॅकेटमधील लोक बांगलादेशशी जोडलेले आहेत.हे लोक प्रत्येक प्रत्यारोपणासाठी 25 ते 30 लाख रुपये घेतात. देणगी देणारे आणि स्वीकारणारे दोघेही बांगलादेशचे होते.
या रॅकेटमध्ये सहभागी असलेले लोक 2019 पासून मानवी अवयव तस्करीचे रॅकेट चालवत होते. बांगलादेशातून चालणाऱ्या किडनी
रॅकेटप्रकरणी एकूण 7 जणांना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील रुग्णालयात आतापर्यंत सुमारे 16 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत.
हे रॅकेट बांगलादेशातून राजस्थानमध्ये चालवले जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातून या दात्यांना उपचार किंवा नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली येथे आणून त्यांची किडनी काढण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव विजया कुमारी असून ती दिल्लीतील सरिता विहार येथील रुग्णालयात काम करत होती.