उस्मानाबाद : भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षांतर करण्याची शक्यता आहे. या हालचाली पाहता त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला ‘आतापर्यंत असे बरेच मुहूर्त एकलेत.. काहीही होणार नाही’, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच भाजपचा एकही आमदार राष्ट्रवादीत जाणार नसल्याचे निक्षुण सांगितले.
उस्मानाबाद दौर्यावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या फडणवीस यांनी यावेळी राजकीय तोफगोळेही डागले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भाजपमध्ये गेलेले अनेक राष्ट्रवादीचे नेते परतण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले होते. त्यावर फडणवीस यांनी ‘एकही आमदार जाणार नाही. भाजप मजबूत आहे’, अशी प्रतिक्रिया दिली. तर एकनाथ खडसेंच्या संभाव्य पक्षांतराबाबत ‘असे बरेच मुहूर्त ऐकले आहेत. काहीही होणार नाही’ असे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, खासदार शरद पवारांपासून दुरावलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश नाही, असे पवारांनी तुळजापुरात नाव न घेता सांगितले होते. या विचारलेल्या प्रश्नाला शरद पवारांनी कोप-यापर्यंत हात जोडत नाव न घेता दिल्या घरी सुखी रहा, असा वडीलकीचा सल्ला दिला. त्यानंतर फडणवीस उस्मानाबादेत आल्यानंतर त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात असतानाही आ. पाटील यांनी त्यांना मुक्कामाला आपल्या घरी नेले. आजपर्यंतचा पवारांच्या दौर्यावेळी त्यांचा मुक्काम आ. पाटील यांच्या घरीच असे, या वेळी पवारांचा मुक्काम तुळजापूरच्या विश्रामगृहात होता. या दोन्ही घटनांची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती.