उस्मानाबाद : नुकसान मोठं आहे, लवकरात लवकर मदत देऊ, सर्व नुकसानीला मदत देऊ, विरोधकांच्या टीकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. जे करायचे ते ठोस करायचे हा माझा स्वभाव आहे, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारीही पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आढावा घेतला. राज्यातील विविध भागात परतीच्या पावसानं शेतमालाच प्रचंड नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषेदत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्री म्हणाले, थिल्लर-चिल्लरपणावर बोलण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. त्यांचं काय ते चालू द्या. मला माझ्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे. सध्या सगळा वेळ त्यासाठीच देतोय. इतर गोष्टींवर बोलण्यात वेळ घालवणार नाही, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.
शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशा मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. पाहणी दौऱ्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,”मदत किती, कशी? कधी करायची, याबाबत विचार सुरू आहे. मुंबईत काम सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.