नवी दिल्ली : नोकियाने एक जबरदस्त वायरलेस हेडफोन लाँच केला आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर याचा ४० तास वापर करू शकतो, असा कंपनीचा दावा आहे. तसेच याची साउंड क्वॉलिटी सुद्धा जबरदस्त आहे.
Nokia Essential Wireless Headphones ला यूरोपमध्ये ५९ डॉलर म्हणजेच ५ हजार १०० रुपयांत लाँच केले आहे. पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरपासून जगभरात खरेदी करता येवू शकते. ब्लॅक कलरमध्ये लाँच करण्यात आलेल्या या इअर हेडफोनची विक्री भारतात पुढील महिन्यापासून सुरू केली जाणार आहे.
नोकियाचा हा वायरलेस हेडफोन फोल्डेबल आहे. गरज पडल्यास यात ३.५ एमएम जॅकने जोडता येवू शकते. कोणत्याही डिव्हाईस सोबत कनेक्ट करता येवू शकते. हा हेडफोन गुगल असिस्टेंट आणि सीरी यासारख्या व्हाइस असिस्टेंस फीचर्सला सपोर्ट करतो. यात माइक सुद्धा दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नोकिया असेंशियल वायरलेस हेडफोन मध्ये 40mm dynamic drivers आहे. जे २० हार्ट्ज २० हजार हार्ट्ज पर्यंत फ्रिक्वेंसी वर रिस्पॉन्स करू शकता. या हेडफोनला बेस आउटपूट खूप जबरदस्त आहेत. याची साउंड क्वॉलिटी जबरदस्त आहे.
१९७ ग्रॅम वजनाचा नोकिया नवीन वायरलेस हेडफोन मध्ये ब्लूटूथ ५.० सपोर्ट करतो. तसेच यात चार्जिंग साठी मायक्रो यूएसबी पोर्ट आहे. या हेडफोनमध्ये 500mAh बॅटरी दिली आहे. फुल चार्ज करण्यासाठी याला ३ तास लागतात. याची बॅटरी बॅकअप ४० तासांची आहे. कंपनीचा दावा आहे की, या हेडफोनला तासन तास कानाला लावू शकतात. नोकियाच्या या हेडफोनची टक्कर सोनी आणि वनप्लस सारख्या अन्य कंपन्यांच्या वायरलेस इयरफोन आणि हेडफोन सोबत होईल.