सांगली : तावडे हॉटेल येथील तनवाणी हॉटेलमध्ये आयपीएलच्या सामन्यावर जुगार (बेटींग) प्रकरणी सांगलीतील आणखी एका संशयितास,कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. सनी ऊर्फ मिलिंद धनेश शेटे (वय 26, रा. सांगली) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, आयपीएल क्रिकेट मॅचवर तावडे हॉटेल कोल्हापूर येथील तनवाणी हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या बेटींगवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 18 ऑक्टोबरला छापा टाकला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बेटिंगप्रकरणी संशयित उमेश शिंदे (वय 39, रा. सांगली) याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून 36 हजाराहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणातील त्याचा साथिदार संशयित मिलिंद शेटे याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, सागर कांडगावे,शाहूपुरीचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, प्रशांत घोलप यांच्या पथकाने केली. यामागे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.