भोपाळ : मध्य प्रदेशात २८ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीर काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. दमोहचे काँग्रेस आमदार राहुल लोधी यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
आज सकाळी लोधी यांनी आपला राजीनामा मध्य प्रदेश विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आगामी पोटनिवडणुकीत भाजप सर्व जागी निवडून यावी, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे लोधी यांनी सांगितले.
जुलै महिन्यात राहुल लोधी यांचे चुलत भाऊ प्रद्युम्न सिंह लोधी यांनी मलाहरा विधानसभा मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते मलहरा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी पक्ष सोडला त्यावेळी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे राहुल लोधी यांनी सांगितले होते. परंतु, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.