मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईची तुलना पाकिस्तानशी करणाऱ्या अभिनेत्री कंगणा राणावतवरही काल शिवसेना दसरा मेळाव्यात जोरदार टीका केली. मुंबई आणि महाराष्ट्रचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची, महाराष्ट्राची बदनामी कशाला करायची?, असं मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले होते. यावर कंगनानेही घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी, अशा शब्दात टीका केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आता मुख्यमंत्र्यांच्या टीकेला आता कंगनानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.’मुख्यमंत्री, तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी. लोकसेवक असताना तुम्ही क्षुल्लक गोष्टींवरून संघर्ष करत आहात. तुमच्याकडे असणारी सत्ता तुमच्याशी सहमत नसलेल्या इतरांचा अपमान करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी,’ अशा तिखट शब्दांत कंगनानं मुख्यमंत्री ठाकरेंवर पलटवार केला आहे.
काल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. दरम्यान, आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवलाय. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल असा इशारा देखील विरोधकांना काल ठाकरे यांनी दिला.