दौंड : सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे तर 3 महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पांढरेवाडी गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या अनुराधा हॉटेल येथे करण्यात आली. दोन महिला या पश्चिम बंगालमधील आहेत तर एक महिला महाराष्ट्रीयन आहे.
दौंड तालुक्यात पांढरेवाडी गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर असलेले अनुराधा हॉटेल याठिकाणी देहविक्री व्यवसाय केला जात आहे, अशी गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती. महामार्गालगत असलेल्या अनुराधा हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवळी यांना मिळाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल चालक दिवाकर मथु शेट्टी (वय-34 रा. उडपी, कर्नाटक) व डायसन डेनिस डिसूजा (वय-27) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करत आहेत.
* बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश
पोलिसांनी अनुराधा हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला. त्यानंतर सेक्स रॅकेटची खबर पक्की झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या पथकाने छापा टाकला. हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी ठेवलेल्या तीन महिलांची सुटका पोलिसांनी केली. त्यापैकी दोन महिला या पश्चिम बंगालमधील आहेत तर एक महिला महाराष्ट्रीयन आहे.