भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना-भीमा या दोन्ही नद्यांना आलेल्या पाण्यामुळे नद्यांच्या कडेला वसलेल्या अनेक गावांमध्ये महापुराचा महातांडव झाला. या पुराच्या तडाख्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालंय. त्यात पाऊस थांबायच नाव घेईना. त्यात भर पुढा-याच्या, राजकीय मंडळीच्या कोरड्या आश्वासनाची भर पडलीय. थोडक्यात या पुरात दक्षिण सोलापूर तालुका राजकीय अड्डाच झालाय.
या पुरामुळे अनेक गावांतील नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले घराबरोबरच अनेक शेतक-यांच्या शेतामध्ये महापुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आता काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलाय. जसजसा पूर ओसरला तसतसा शेतकरी वर्ग समाधानी झाला पण शेतातील तूर,उडीद, मका, ऊस, भुईमुग, कांदा अशा पिकावर पाणी फिरल्याने होत्याचे नव्हते झाले.
आता आम्हाला तारणार कोण अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात पडली असल्याने शेतकऱ्यांचे डोळे शासनाकडे लागले काहीतरी मिळेल या आशेने शेतकरी वाट बघत आहे. मायबाप सरकारने ओढून ताणून मदतीची घोषणा केलीय. दिवाळीपर्यंत तोकडी मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे.
मात्र दक्षिणच्या या महापुराचा फायदा राजकीय नेतेमंडळी महापुराच्या नावाखाली राजकीय पोळी भाजुन घेण्याच काम नेतेमंडळी करीत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. सीना-भीमा नदीला आलेला राजकीय मंडळीचा महापूर पूरग्रस्तांनच्या मदत मिळवुन देतो म्हणत सगळेच राजकीय पक्षांनी दौरे केले, करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनेक राजकीय मंडळींनी दक्षिणच्याभीमा- सीना खोऱ्यात पूरपस्थितीची पाहणी सुरवात केली भाजप,शिवसेना, काँग्रेस आदींसह इतर पक्षाचे नेतेमंडळी गावोगावी भेटी दिल्या, आश्वसनं दिली. सात ते आठ दिवसात पुरामध्ये नुकसान झालेल्या घरांना दहा हजारांची मदत व धान्य
देवु असे प्रत्येक राजकीय मंडळींनी आश्वासनाची खैरात केली.
शेतकरी केंद्रबिंदू मानून राजकीय दौरे झाले की राजकारण या सगळ्यांचा विचार केला तर दक्षिण तालुका हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. शेवटी काय तर पुराचा तडाखा पुढाऱ्यांचा भडका शेतकरी कळका असी गत दक्षिण भीमा-सीना शेतकऱ्यांची झाली आहे.
* हेच का ते राजकारण…
निवडणुका आल्या की फक्त आठवतो वडापुर धरण, मंद्रुपच एम.आय.डी.सी., बोरामणीचे विमानतळ, मंद्रुपचे सीतामाई तलाव, सिना -भिमा नदीला आठमाही-बारमाही पाणी, बंदलगीचा बंधारा असो की निवडणुकीत पक्षाचा प्रचाराचा नारळ प्रत्येक वेळेस कुरघोडीची राजकीय परिस्थती दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येक गावांतील मतदारांनी अनुभवली आहे.
संकलन – नितीन वारे, भंडारकवठे