या पत्रातील मजकूराशी सहमत असणाऱ्यांनी आपले नाव खाली टाकावे.
त्या नावांचा अंतर्भाव करून पत्र मुख्यमंत्र्यांना आणि माध्यमांना देण्यात येईल. हे पत्र जरी फ्रेन्डस ऑफ डेमोक्रसीच्या फेसबुक पेजवर टाकलेले असले तरी मुख्यमंत्र्यांना द्यायच्या पत्रात फ्रेडन्स ऑफ डेमोक्रसीचा उल्लेख असणार नाही. फक्त नावे असतील.
मा. मुख्यमंत्री
महाराष्ट्र शासन,
आज कोरोनाच्या संकटामुळे साऱ्या देशाप्रमाणेच महाराष्ट्र देखील मोठ्या कठीण परिस्थितीतून जात आहे. राज्याचा आर्थिक गाडा पूर्वपदावर आणण्यासाठी लोकांचे आर्थिक व्यवहार पुन्हा नेहमीसारखे सुरु होतील यासाठी आवश्यक असे नियमांचे शिथिलकरण करत असतानाच दुसरीकडे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात न येऊ देणे ही तारेवरची कठीण कसरत आपल्या सरकारला करावी लागतेय. अर्थात ही दुविधा सर्वच राज्यातील सरकारांपुढे आहे. पण आपल्यासमोर यात आणखीन एक भर पडली. तो म्हणजे मंदिरे उघडण्यासाठी राज्यपालांनी आपल्यावर आणलेला दबाव आणि ‘सेक्युलारीझमला दाखवलेला उघड विरोध.
आपल्या शासनासमोर दोन पर्याय आहेत . एकतर लोकांच्या आरोग्याचा विचार करायचा आणि दुसरा पर्याय म्हणजे लोकांच्या श्रद्धांचा विचार करायचा. सेक्युलारिझम चे तत्व असे कि लोकांच्या ऐहिक (सेक्युलर) हिताच्या आड त्यांच्या श्रद्धा येत असतील तर शासनाने ठामपणे सेक्युलॅरिझमच्या बाजूने उभे रहावे. पण राज्यपालांची भूमिका तुम्ही लोकांच्या श्रद्धांच्या बाजूने उभे राहावे अशी आहे.
घटनेतील धर्मस्वातंत्र्यासंबंधीचे कलम २५ आरोग्याला बाधा येत असल्यास आवश्यक ते प्रतिबंध धर्मस्वातंत्र्यावर लावण्याचा अधिकार सरकारला देते.
लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी असा उपयोग आम्हाला अतिशय आक्षेपार्ह वाटतो. कारण असे श्रद्धांचा उपयोग करून केलेले राजकरण यशस्वी झाले आणि देवळे उघडली गेली तर ते भाविकांच्यासाठीच धोक्याचे ठरू शकते.
हिंदू धर्मातील भागवत परंपरा ही कर्मकांड नाकारणारी , देव फक्त मंदिरात असतो हे नाकारणारी परंपरा आहे. हे पत्र लिहिणारे आम्ही सर्व ही परंपरा मानणारे लोक आहोत. मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्यात आनंद असतो पण,
‘देव देव्हाऱ्यात नाही, देव मूर्तीत ना मावे,
तीर्थक्षेत्रात ना गावे, देव आपणात आहे,
शीर झुकवोनिया पाहे’
अशी माणसाच्या श्रद्धेला व्यापक करणारी परंपरा आम्ही मानतो. ही परंपरा स्वाभाविकपणेच कर्मकांडाला नकार देणारी असल्याने लोकांच्या श्रद्धेचे होणारे सवंग राजकारण नाकारणारी आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सेक्युलर माणूस धार्मिक असू शकतो , श्रद्धाळू असू शकतो. पण शासनाची भूमिका या श्रद्धेमुळे न ठरता लोकांचे ऐहिक हित लक्षात घेऊन ठरली पाहिजे असे हा सेक्युलर माणूस मानतो.
जेंव्हा प्रश्न श्रद्धांचा असतो तेंव्हा अशी ठाम भूमिका राजकीय दृष्ट्या कठीण असले तरी ती आपण ठामपणे घेतली आणि सेक्युलरिझमच्या बाजूने उभे राहिलात आणि त्याची राज्यपालांना देखील स्पष्ट शब्दात जाणीव करून दिलीत याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो.
आपले,
मिलिंद मुरुगकर
शांता गोखले
भारती शर्मा
विश्वास उटगी
राज कुलकर्णी
लोकेश शेवडे
सुनील तांबे
आशुतोष शिर्के
मुकेश माचकर
जयंत माईणकर
मयूर डुमणे
संकेत मुनोत
मनीषा माने
संजय जगताप
अरविंद पाखले
प्रतीक पाटील
सचिन कुळकर्णी
डॅा. मंजिरी मणेरीकर
मिलिंद रानडे
सुनील वालावलकर
निशिकांत थरथरे
आनंद शितोळे
भास्कर जेधे
डॉ जयेंद्र परुळेकर
सुभाष वारे
संजय मंगला गोपाळ
मनीषा पाटील
नवनाथ पोरे
आपली सहमती असल्यास नावे येथे ग्रुपवर द्यावीत
आपल्या स्वतःच्या फेबु पेजवर हे पत्र आपल्या नावासह शेअर करावे.
* एक फडणवीस प्रेमी