श्रीपूर : गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून महाराष्ट्रासह भारत देशात कोरोना आजाराचा आलेख खाली येऊ लागल्याने तसेच ग्रामीण भागातही कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र आज महाळुंगमध्ये एकाच दिवशी २५ रुग्ण आढळल्याने भीतीचे सावट आले आहे.
महाळुंग प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने महाळुंग परिसरात बुधवारी कोरोना रॅपिड टेस्ट घेतली. ५१ जणांची टेस्ट घेण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यात महाळुंग परिसरातील २३ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर इतर ठिकाणचे दोनजणांना कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे असे एकूण २५ जणांचा कोरोनो पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने महाळुंग ,श्रीपुर आणि ग्रामीण परिसरात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागात कोरोना वाढू नये म्हणून महाळुंग ग्रामपंचायत दक्षता कमिटी, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी, पोलीस पाटील, पोलिस खाते यांच्यावतीने ग्रामीण ग्रामीण भागात कोरोन आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले आहेत.