सोलापूर / पुणे : राज्यात शिक्षक भरती ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांची 12 हजार 400 पदे भरण्याचा निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी शिक्षण आयुक्तांना आदेशही जारी केले आहेत. यामुळे आता भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी शिक्षण विभागातील हालचालींना वेग येऊ लागला आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून गेल्या वर्षापासून शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ही प्रणाली विकसित करण्यात आली.
तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांची 12 हजार 400 पदे भरण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यापैकी सहा हजार पदांची भरती पूर्ण झाली. उर्वरित पदभरतीवर वित्त विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थितीचे कारण देत बंदी घातली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आता 3 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या पदभरतीवरील बंदी उठविली. त्यानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरु असलेली शिक्षणसेवक पदभरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.
राज्यातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. तरीही दहा ते 20 पटसंख्या असलेल्या सुमारे साडेसतरा हजार शाळांचे अन्य ठिकाणच्या शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. आता या शाळांवरील सुमारे दहा हजारांहून अधिक शिक्षक अतिरिक्त होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.