मुंबई : प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. याचमुळे मुंबईत होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा रिओपनिंगचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. जवळपास आठ महिन्यांनी नाट्यगृह सुरू झाली होती. अशात ही माहिती समोर आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लॉकडाउननंतर पहिल्यांदाच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग १२ डिसेंबरला पुण्यात झाला होता. पुण्याचा प्रयोग संपल्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांना थोडीशी कणकण जाणवत होती. यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांचं आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला.
फेसबुकवर प्रशांत दामले यांनी एक व्हिडिओ शेअर करून यासंबंधीची सविस्तर माहिती दिली. बुधवारपासून आयसोलेशनमध्ये असल्यामुळे बोरिवली आणि गडकरी नाट्यगृहात होणारे प्रयोग रद्द करावे लागणार आहे. प्रशांत दामले यांच्यासोबत काम करणारे सह-कलाकार निरोगी असल्याचंही दामले यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं.
दरम्यान, जवळपास आठ महिन्यांनी नाट्यगृह सुरू झाली होती.