नवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिटी (एसएससी) ने एसएससी सीजीएलसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. त्याबरोबरच एसएससी-सीजीएल परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एसएससी सीजीएल २०२० च्या टीयर १ ची परीक्षा २९ मे पासून ७ जून २०२१ दरम्यान आयोजित होणार आहे.
या भरती प्रक्रियेत ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील एकूण ६ हजार ५०६ पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रुप बीमधील गॅझेटेड श्रेणीतील २५० पदे, ग्रुप बीमध्ये नॉन गॅझेटेड श्रेणीची ३ हजार ५१३ पदे आणि ग्रुप सी मधील २ हजार ७४३ पदांची भरती होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्टाफ सिलेक्शन कमिटीकडून आयोजित होणाऱ्या या परीक्षेसाठी कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेकडून कुठल्याही विषयावर पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी मिळवलेले उमेदवार अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांसाठीची वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निर्धारित करण्यात आली आहे. सोबतच आरक्षित वर्गांसाठी वयोमर्यादित सूट देण्यात आली आहे.
* अर्ज करण्याची निर्धारित वेळ
ही परीक्षा संगणकावर आधारित असेल. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ असलेल्या ssc.nic.in वर देण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशनच्या आधारावर अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख ३१ जानेवारी २०२१ निर्धारित करण्यात आली आहे.
* या विभागात होणार भरती
या भरती प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागातील इन्स्पेक्टर सेंट्र्ल एक्साइज, असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाऊंट ऑफिसर, इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर असिस्टंट, इन्स्पेक्टर एक्झामिनर, इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर (सीबीआय), असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, ज्युनियर स्टेटिस्टिकल ऑफिसर, इन्स्पेक्टर (डाक विभाग आणि सेंट्रल ब्युरो ऑफिस ऑफ नार्कोटिक्स), ऑडिटर, सिनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट, असिस्टंट सुपरिटेंडेंट, डिव्हिजनल अकाऊंटंट, अप्पर डिव्हिजनल क्लार्क (यूडीसी), टॅक्स असिस्टंट पदांवर भरती निघाली आहे.