मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ८ विकेटनी विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. लाजिरवाण्या पराभवाचे उत्तर भारतीय संघाने अभिमानास्पद विजयाने दिले आहे. लाजिरवाण्या पराभवामुळे भारतीय संघ टीकेचा धनी झाला होता.
एडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा दुसऱ्या डावात ३६ धावांवर ऑल आउट झाला होता. त्यानंतर भारताने तो सामना ८ विकेटनी गमावला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात चार बदलासह भारतीय संघ मैदानात उतरला. प्रथम गोलंदाजांनी केलेली उत्तम कामगिरी त्यावर फलंदाजांनी मिळून दिलेली आघाडी आणि पुन्हा गोलंदाजांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारताने बॉक्सिंग डे कसोटीत आठ विकेटनी विजय साकारला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ऑस्ट्रेलिया दौर्यावरील दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळविला. यासह ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी देखील साधली. ऍडलेड कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ टीकेचा धनी झाला होता. अवघ्या ३६ धावांवर डाव संपुष्टात आल्याची जखम भारतीय क्रिकेट जगतात कित्येक काळ भळभळत राहील, अशीच शक्यता होती. मात्र अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जिगरबाज वृत्ती दाखवून पुनरागमन करत या जखमेवर फुंकर मारली आहे.
हा विजय भारतीय संघासाठी अनेक दृष्टीने महत्वाचा आहे. आपल्या कसोटी इतिहासातील सगळ्यात नीचांकी धावसंख्या नोंदविल्यानंतर साहजिकच कुठल्याही संघाचा आत्मविश्वास डळमळीत होतो.
* ‘जॉनी मुलाघ’ मेडल घेणार पहिला भारतीय
कर्णधार अजिंक्य रहाणे याचा सामनावीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यासोबतच ‘जॉनी मुलाघ’ हे मेडल (Johnny Mullagh Medal) देऊन रहाणेचा सन्मान करण्यात आला. हे मेडल मिळवणारा रहाणे क्रिकेट विश्वातील पहिला खेळाडू ठरला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वीच ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात सामनावीर खेळाडूला खास मेडल देण्याचा निर्णय घेतला होता. हे मेडल अर्थातच ‘जॉनी मुलाघ’ मेडल होय. जॉनी मुलाघ हे ऑस्ट्रेलियाने केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात संघाचे कर्णधार होते. 1868 ला ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा जॉनी मुलाघ यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व केले होते. आता त्यांच्याच सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे.
* शास्त्री गुरूजीने केले कर्णधार राहणेंचे कौतुक
कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात नाबाद २७ धावा झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अजिंक्यच्या या शतकी खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रशिक्षक रवी शास्त्रींनी या विजयानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेचे कौतुक केले. रहाणे खूप चतूर कर्णधार असून सामन्याचे पारडे कुठे झुकते आहे याचा अंदाज त्याला येतो. माझ्या मते नवोदीत खेळाडूंसाठीही त्याचा शांत स्वभाव फायदेशीर ठरला. उमेश दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतरही मैदानावर एका प्रकारे आत्मविश्वास दिसत होता. सामना संपल्यानंतर झालेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत रवी शास्त्री बोलत होते. विराटच्या मनात असते ते लगेच चेहऱ्यावर येते. पण अजिंक्य शांत राहून रणनिती आखतो. त्याला काय साध्य करायचे आहे हे त्याला माहिती असते. म्हणूनच तो शांत राहून नेतृत्व करतो. पहिल्या डावातील त्याचे शतक हा सामन्यातील टर्निंग पॉईंट असल्याचेही शास्त्री म्हणाले.