नवी दिल्ली : भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 178 धावांवर आटोपला, पहिल्या डावात त्यांनी भारतापुढे 420 धावांचे आव्हान ठेवले आणि भारताने 1 बाद 39 धावा केल्या.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 1 गडी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने 300 विकेट घेण्याचा विक्रम केला. असा पराक्रम करणारा इशांत तिसरा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला. इशांत आधी कपिल देव आणि झहीर खान यांनी कसोटी सामन्यात 300 बळी घेतले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* 114 वर्षानंतर पहिल्यांदा अश्वीनने मोडला अनेक दशकांपूर्वीचा विक्रम
चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं पहिल्या डावात 578 धावांचा पाठलाग करताना 337 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात 241 धावांनी भारतीय संघा पिछाडीवर असताना इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अश्विन यानं पहिल्याच चेंडूवर सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स याला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केलं. दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर बळी घेत 114 वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला.