मुंबई : आज सोमवारपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. 3 रुपयांनी हा प्रवास महागणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 18 ऐवजी 21 रूपये मोजावे लागणार आहेत. तर टॅक्सीसाठी 22 ऐवजी 25 रूपये द्यावे लागणार आहेत. सहा वर्षानंतर ही भाडेवाढ करण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरीनंतर किमान भाडेदरात ही वाढ करण्यात आली.
कोरोनाच्या माहामारीमूळे प्रवासी वाहतूक डबघाईस आल्याने राज्य सरकारने रिक्षा,टॅक्सीला भाडेवाढ लागु केली आहे. यामध्ये रिक्षा,टॅक्सीला प्रत्येकी 3 रूपये भाडेवाढ दिल्याने, आता रिक्षासाठी 21 तर टॅक्सीसाठी 25 रूपये मोजावे लागणार आहे. तर नाईट चार्जसाठी एकूण प्रवासाच्या किलोमीटर भाड्याच्या 25 टक्के जास्त भाडे आकारल्या जाणार असून, सोमवार पासून मुंबई महानगरात नवीन दर लागु केले जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खटुआ समितीच्या शिफारशीनुसार दरवर्षी 1 जुन रोजी भाडेवाढ करणे आवश्यक होते. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून रिक्षा, टॅक्सीला भाडेवाढ देण्यात आली नव्हती, त्यामूळे खटूवा समितीच्या शिफारशीचा आधार घेऊनच यावेळी रिक्षा,टॅक्सीला प्रत्येकी 3 रूपयांची भाडेवाढ लागु केली असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले होते.
त्यानुसार 1 मार्च पासून मुंबई महानगरांमध्ये ही भाडेवाढ लागु होणार असून, रिक्षा, टॅक्सी चालक मालकांनी आपल्या वाहनाचे मिटर कॅलिब्रेशन करून घेण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत दिली आहे. तर 1 जुन पासून रिक्षा, टॅक्सीचे मिटरमध्ये नवीन दर दिसणे बंधनकारक राहणार आहे.
* अशी आहे नवीन भाडेवाढ
पहिल्या टप्याला रिक्षाला 18 ऐवजी आता 21 रुपये मोजावे लागेल तर पहिल्या टप्यानंतर दर किलोमीटर 12.1 रुपये यापुर्वी आकारल्या जात होते. त्यामध्ये 2.1 रुपयांची वाढ करून आता 14.20 रूपये तर टॅक्सीला 22 ऐवजी 25 रुपये मोजावे लागणार असून, पहिल्या टप्यानंतर दर किलोमीटर 14.3 रुपयांमध्ये 2.9 रुपये वाढ करून आता दर किलोमीटर 16.93 रूपये आकाल्या जाणार आहे.