नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एम्समध्ये जाऊन कोरोना लस टोचून घेतली. मोदी जेव्हा लस घ्यायला आले तेव्हा लस देत असताना मोदींनी नर्सेसला असं काही म्हटलं की नर्सेसलाही हसू आवरले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोना लशीचा पहिला डोस आज घेतला. राजकारणी जाड कातडीचे असतात त्यामुळे तुम्ही मला लस देण्यासाठी वेगळी सुई वापरणार का? असं मोदी म्हणाले. त्यानंतर नर्सेसलाही हसू आवरले नाही.
यावेळी पाँडेचेरीची नर्स पी. निवेदा यांनी त्यांना कोरोना लस दिली. ‘लस दिली पण, कळलेच नाही, असे आम्हाला मोदीजी म्हणाले’, असे निवेदा यांनी सांगितले. तसेच आम्ही कुठे राहतो, अशीही विचारणा केल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान आजपासून देशात कोरोना लसीकरणाचा पुढला टप्पा सुरू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोदींना लस देणाऱ्या नर्स पी. निवेदा या पुदुच्चेरीच्या आहेत. त्या गेल्या तीन वर्षांपासून नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात काम करतात.
पंतप्रधान मोदींना लस देतानाचा अनुभव त्यांनी सांगितला आहे. ‘आज सकाळीच पंतप्रधान मोदींना लस देण्याची सूचना त्यांना देण्यात आली. पंतप्रधानांना भारत बायोटेक कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या लशीचा दुसरा डोस अजून बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी माझी विचारपूस केली. तसंच डोस कधी दिला हे आपल्याला जाणवलं देखील नाही,’ असं मोदी म्हणाले असं निवेदा यांनी दुरदर्शनशी बोलताना सांगितले आहे.