मुंबई : सोशल मीडियावरील वाद-विवादाला आता कोणत्याच सीमा राहिल्या नाहीत. आताच पहा ना, सध्यादेखील सोशल मीडियावर एका महिलेल्या फोटोवरुन मोठा वाद रंगला आहे. या महिलेने बाथरूममध्ये कमोडवर बसलेला आपला फोटो शेअर केला होता. यावरुन संस्कृतीरक्षक आणि उदारमतवादी असा वाद चांगलाच रंगला आहे.
या महिलेच्या पोस्टची फेसबुकसह सोशल मीडियावर संस्कृतीरक्षक विरुद्ध उदारमतवादी असा वाद रंगला आहे. हे आईपणाचं उदात्तीकरण आहे की खरंच महिलांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते, याविषयी विविध मुद्दे मांडले जात आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बाथरुमपीक पोस्ट केलेल्या महिलेचे गीता यथार्थ असे नाव आहे. त्यांनी सिंगल पॅरेटिंगमधील आव्हानं काय असतात, हे समजण्याच्या उद्देशाने हा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. मात्र, त्यावरून काही स्वयंघोषित संस्कृती रक्षकांनी गीता यथार्थ यांना ट्रोल करायला सुरुवात केले. हा फोटो म्हणजे अश्लिलता असल्याचे या संस्कृती रक्षकांचे म्हणणे आहे. हे तर काय सगळेच करतात, पुरुषांनाही मूल सांभाळताना हे करावंच लागतं, यात असा सनसनाटी फोटो टाकण्याची काय गरज, अशा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.
तर दुसरीकडे अनेकजणांनी गीता यथार्थ यांचे समर्थन करत स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना फटकारले आहे. या फोटोमध्ये कोणतीही अश्लिलता नाही. फक्त एक दिवस पूर्णवेळ लहान मुलाला सांभाळून दाखवा. जेणेकरून एका आईला काय करावे लागते, हे तुम्हाला समजेल. या सगळ्या वादामुळे सध्या सोशल मीडियावर गीता यथार्थ हे नाव प्रचंड चर्चेत आहे.
* कोण आहे ही महिला
काही दिवसांपूर्वी भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत असणाऱ्या गीता यथार्थ यांनी फेसबुकवर स्वत:चा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये त्या बाथरूमच्या कमोडवर बसल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांनी बाथरुमचा दरवाजा उघडा ठेवला आहे. सिंगल पॅरेंट असल्यामुळे गीता यांना आपल्या लहान मुलाची सतत काळजी घ्यावी लागते. त्यामुळे गीता यांना अगदी बाथरुमला जातानाही मुलाला एकटे सोडता येत नाही. त्यामुळेच आपण बाथरुमला जाताना दरवाजा बंद करत नाही, असे गीता यथार्थ यांनी सोशल मीडियावर सांगितले होते.