नवी दिल्ली : अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षापासून मिथुन राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. आता या चर्चा खऱ्या ठरणार आहेत. मिथुन लवकरच राजकीय नेता बनणार आहे. 7 मार्चला मिथुन भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. कोलकातातील ब्रिगेड मैदानावर नरेंद्र मोदींच्या सभेलाही तो हजर राहणार आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसकडून तो 2014 ते 2016 या काळात राज्यसभा सदस्य राहिला होता.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सकाळी मुंबई येथे मिथुन चक्रवर्ती यांच्या घरी भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरूर झाल्या आहेत. येणाऱ्या पश्चिम बंगाल विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, मिथुन चक्रवर्ती राज्यसभेचे सदस्य होते.
1980 – 90 या वर्षात अभिनेता मिथुन चक्रवर्ती त्यांत प्रसिद्ध असे अभिनेते होते. तसेच महाराष्ट्र पाठोपाठ मूळचे पश्चिम बंगालचे असलेले चक्रवर्ती यांचा पश्चिमबंगाल मध्ये मोठा चाहता वर्ग आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विशेष म्हणजे बंगालमध्ये भाजप आपल्या पक्षाला स्थानिक चेहरा देण्यासाठी शोध घेत असताना मुळचे बंगाली असणारे मिथुन आणि सरसंघचालकांची भेट महत्त्वाची मानली जात होती. या निवडणुकांच्या अनुशंघाने भाजप मिथुन यांच्यावर काही जबाबदारी सोपविणार असल्याची देखील चर्चा रंगू लागली होती. आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते.
यावर प्रतिक्रिया देताना चक्रवर्ती म्हणाले की,”मोहन भागवतांबरोबर मी अध्यात्मिक अंगाने जोडलो आहे. लखनऊमध्ये मी त्यांना भेटलो होतो. त्यानंतर मी त्यांना, मुंबईत आल्यानंतर एकदा माझ्या घरी भेट द्या, अशी विनंती केली होती.
* रविवारी मिथुनचा भाजपमध्ये प्रवेश ?
अभिनेता मिथुन चक्रवर्ती रविवार, 7 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं च्या ब्रिगेड मैदान रॅलीमध्ये मिथुन चक्रवर्ती उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, 16 फेब्रुवारी रोजी मिथुन चक्रवर्ती यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासूनच मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, मिथुन चक्रवर्ती राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी ममता बॅनर्जीं चा पक्ष टीएमसीने मिथुन यांना राज्यसभेत खासदारकी दिली होती. ते 2014 पासून डिसेंबर 2016 पर्यंत टीएमसीकडून राज्यसभेत खासदार होते.