Tuesday, May 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

आत्महत्या शक्य नाही, पोलिसांनी चुकीची माहिती देऊ नये, पोलिसांच्या दाव्यावर पत्नीचा आक्षेप

Surajya Digital by Surajya Digital
March 5, 2021
in Hot News, महाराष्ट्र
0
आत्महत्या शक्य नाही,  पोलिसांनी चुकीची माहिती देऊ नये, पोलिसांच्या दाव्यावर पत्नीचा आक्षेप
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांनी कळवा खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली होती. दरम्यान मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून ते आत्महत्या करणं शक्य नसल्याचं सांगत पोलिसांनी चुकीची माहिती देऊ नये अशी विनंती केली आहे. यावेळी त्यांनी कांदिवली क्राइम ब्रांचमधील तावडे नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे.

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आज आढळून आला. याप्रकरणी मनसुख यांची पत्नी विमल यांनी मी आणि माझा परिवार असा याबाबत विचार करू शकत नाही. आठ दिवसांपूर्वी गाडी हरवली होती. पोलिसांना माझे पती पूर्ण सहकार्य करत होते, असे सांगितले. मात्र माझ्या पतीच्या मृत्यूचो सखोल चौकशी व्हावी, कारण ते आत्महत्या करूच शकत नाही, अशी मागणी विमल यांनी केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पुढे विमल यांनी सांगितले की, काल सुद्धा पोलिसांनी हिरेन यांना बोलावले. कांदिवली क्राईम ब्रँचचे तावडे नावाच्या पोलिसाचा फोन आला. त्या पोलिसाने घोडबंदर येथे भेटायला बोलावले. मनसुख तिकडे गेले त्यानंतर रात्री १० वाजल्यानंतर मनसुख फोन बंद झाला. मात्र आज बातमी कळली की, त्यांचा मृतदेह मुंब्रा येथे सापडला. पोलिसांकड़ून जेव्हा जेव्हा त्यांना बोलावले तेव्हा त्यांच्याकडून सहकार्य करण्यात येत होते. ते तणावातही नव्हते. मनसुख आत्महत्या करू शकत नाही. तसेच पोलिसांवर संशय आहे का ? असे विचारले असता मला काहीही माहिती नाही असं विमल म्हणाल्या.  मुंब्रा खाडी येथे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असलेले मनसुख हिरेन (वय ५०) हे ठाण्यातील याच विकास पाम इमारतीच्या ए विंगमधील चौदाव्या मजल्यावर वास्तव्यास होते.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणी आज आढळून आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

* विधानसभेत चांगलीच जुंपली

आजच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला मनसुख हिरेन संशायस्पद मृत्यूप्रकरणावरून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात विधानसभेत चांगलीच जुंपली. यात पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनसुख हे ठाण्यातील नौपाडा येथे राहत होते. आज सकाळी १०.२५ मिनिटांनी मनसुख यांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला. नौपाडा पोलिस ठाण्यात आज दुपारी मनसुख बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. मात्र, मनसुख यांचा संशयास्पद मृत्यूमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

* तपास एटीएसकडे देणार – गृहमंत्री

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला.

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.

* मनसुख मृत्यूप्रकरणी काहीतरी काळंबेरं

– मनसुख हिरने मृत्यू प्रकरणी ठाणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे  – गृहमंत्री अनिल देशमुख

– मृत्यूवेळी मनसुख यांचे हात बांधलेले, ते अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओ प्रकरणी ते महत्त्वाचा दुवा होते, त्याला ठाकरे सरकार सुरक्षित ठेवू शकले नाही. आम्ही केंद्राला याची दखल घ्यायला लावू – देवेंद्र फडणवीस.

– मनसुख मृत्यूप्रकरणी काहीतरी काळंबेरं- आशिष शेलार. हे सर्व विधानसभेत बोलत होते.

Tags: #Suicide #notpossible #police #false #information #wife's #objection #policeclaim#आत्महत्या #शक्यनाही #पोलिसांनी #चुकीचीमाहिती #पोलिसांच्या #दाव्यावर #पत्नीचा #आक्षेप
Previous Post

खजूरबानी विषारी दारू मृत्यूप्रकरणी 9 जणांना फाशी तर चारजणांना जन्मठेप

Next Post

अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या सोलापुरातील बाधित शेतकऱ्यांना दोन हप्त्यात निधीचे वाटप

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या सोलापुरातील बाधित शेतकऱ्यांना दोन हप्त्यात निधीचे वाटप

अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या सोलापुरातील बाधित शेतकऱ्यांना दोन हप्त्यात निधीचे वाटप

वार्ता संग्रह

March 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Feb   Apr »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697