नवी दिल्ली : आधारकार्डवर प्रत्येक व्यक्तीचं नाव, फोटो, मोबाईल क्रमांक आणि बायोमेट्रिक डिटेल्स देण्यात आल्या असतात. यात काही जणांना त्यांचा फोटो किंवा मोबाईल क्रमांक बदलायचा असतो. मात्र, ही प्रक्रिया नेमकी कशी केली जाते याची योग्य माहिती नसते. त्यामुळेच आधारकार्डवर असलेला फोटो किंवा मोबाईल क्रमांक कसा अपडेट करायचा हे जाणून घेऊयात.
कोणतेही महत्त्वाचे व्यवहार करायचे असतील तर त्यात आधारकार्ड आणि पॅनकार्ड हे सक्तीचे झाले आहेत. त्यामुळे बँकेच्या व्यवहारांपासून ते अगदी ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यापर्यंत सगळीकडे आधारकार्डचा वापर करणं अनिवार्य झालं आहे. आधारकार्डवर असलेला जुना फोटो बदलायचा असल्यास त्यासाठी संबंधित व्यक्तीला अधिकृत आधारकार्ड केंद्रावर जावं लागेल.
त्यानंतर आधारकार्ड सेंटरवर असलेल्या वेब कॅमेराच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा नवा फोटो काढण्यात येईल. त्यानंतर ९० दिवसांनंतर आधारकार्डवरील फोटो बदलला जातो. परंतु, ही नेमकी प्रक्रिया कशी होते ते एकदा पाहुयात.
* आधारकार्डवरील फोटो अपडेट करण्याची प्रक्रिया
– प्रथम अधिकृत आधारकार्ड केंद्रावर किंवा एनरॉलमेंट सेंटरवर जावे. तेथे गेल्यावर UIDAI च्या संकेतस्थळावरुन आधार एनरॉलमेंट फॉर्म डाउनलोड करा.
– हा फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर केंद्रावर असलेल्या एग्जिकेटिव्हकडे तो जमा करावा आणि सोबतच तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स द्यावेत.
– त्यानंतर केंद्रावर असलेली संबंधित व्यक्ती तुमचे छायाचित्र घेईल. तसंच २५ रुपये आणि त्यावर लागणारा जीएसटीदेखील तुम्हाला द्यावा लागेल.
– सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला ऐक्नालिज्मेंट स्लिप मिळेल. या पावतीवर तुमचा अपडेटेड रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. या नंबरच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या आधारकार्डावरील अपडेट स्टेटस पाहू शकता. त्यानंतर आधारकार्डवर फोटो अपडेट झाल्यावर तुम्ही हे आधारकार्ड डाउनलोड करु शकता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* आधारकार्डवरील मोबाईल क्रमांक असा बदला
– अधिकृत आधारकार्ड केंद्रावर किंवा एनरॉलमेंट सेंटरवर जावे. तेथे गेल्यावर UIDAI च्या संकेतस्थळावरुन आधार एनरॉलमेंट फॉर्म डाउनलोड करा.
– मिळालेल्या फॉर्मवर तुमचा नवा मोबाईल क्रमांक टाका.
– हा फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर केंद्रावर असलेल्या एग्जिकेटिव्हकडे तो जमा करावा. त्यानंतर बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन करण्यात येईल व तुमची रिक्वेस्ट रजिस्टर केली जाईल. तसंच आधारकार्डवरील मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी तुमच्याकडे ५० रुपयांचे शुल्क आकारण्यात येईल.
– प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला ऐक्नालिज्मेंट स्लिप मिळेल. या पावतीवर तुमचा अपडेटेड रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. या नंबरच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या आधारकार्डावरील अपडेट स्टेटस पाहू शकता. त्यानंतर आधारकार्डवर मोबाईल क्रमांक अपडेट झाल्यावर तुम्ही हे आधारकार्ड डाउनलोड करु शकता.