मुंबई : सचिन वाझे याची बदली झाली यावर आम्ही समाधानी नाही. त्याचे निलंबन केले पाहिजे, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे. जोपर्यंत सचिन वाझेचे निलंबन होत नाही तोवर अधिवेशन चालू देणार नाही. ठाकरे सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारे सरकार आहे. या सरकारची प्रतीमा मलीन झाली आहे. सचिन वाझेना तात्काळ यांना अटक झाली आहे. त्याचे निलंबन करुन त्यांची चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
हिरेन मनुसख प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही सचिन वझे यांना हिरेन मनसुख प्रकरणाच्या तपासावरून आणि गुन्हे शाखेतून हलवण्याचा निर्णय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
मनसुख हिरेन प्रकरणात विमल हिरेन यांनी दिलेल्या जबाबानुसार तपास सुरु आहे. विरोधकांकडे काही पुरावे, सीडी किंवा सीडीआर असतील तर त्यांनी एटीएसकडे द्यावेत.
एटीएस याबाबत कोणालाही पाठिशी घालणार नाही. सचिन वझे किंवा कोणाचाही जावई असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे आश्वासन अनिल देशमुख यांनी दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, अनिल देशमुख यांच्या या घोषणेनंतर भाजप आमदार प्रविण दरेकर आणि भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. आम्ही फक्त सचिन वाझेंच्या बदलीवर समाधानी नाही. त्यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा तक्रार अर्जच वाचून दाखवला. विमला हिरेन यांच्या संशयानुसार हिरेन यांची हत्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी केली आहे. त्यामुळे वाझेंना तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. माझ्या पतीची चौकशी वाझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. तसेच हिरेन यांची गाडीही चार महिने वाझेंकडेची होती, असं हिरेन यांच्या पत्नीने म्हटलं आहे. त्यामुळे वाझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वाझे यांना कोण वाचवतंय? असा सवाल करतानाच हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
* शरद पवारांची फोनवरुन चर्चा
सचिन वाझे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन काल मंगळवारी भाजपच्या आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले होते. या गदारोळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी अजित पवार आणि अनिल देशमुख यांना महत्त्वाचा सल्ला दिल्याचे समजते. त्यामुळे आज सभागृहात सत्ताधाऱ्यांची रणनीती नेमकी काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी आज सभागृहात बजेट मंजूर करून घेणे, हाच एकमेव अजेंडा ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे.
* अन्वय नाईक प्रकरण : अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग प्रस्ताव
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फडणवीसांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण हे फडणवीसांनी दाबले, असे अनिल देशमुखांनी काल विधानसभेत केले होते. तसेच, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अशोक चव्हाण यांनी असत्य विधान केल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यात येणार असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.