मुंबई : अभिनेत्री अनुषा दांडेकरने सोशल मीडियावर आपल्या फोटोतून खळबळ माजवली. तिने टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. अनुषानेही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले. दरम्यान, अनुषाने ‘मुंबई मॅटनी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तिचा जन्म 9 जानेवारी 1982 रोजी खारतूम सुडानमध्ये झाला होता. ती लोकप्रिय शो एमटीव्ही रॉक ऑन, इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल आणि एमटीव्ही लव्ह स्कूलमध्ये दिसली.
अभिनेत्री, मॉडेल, होस्ट अनुषा दांडेकरने आपले टॉपलेस फोटो शेअर करत सोशल मीडियावर एकच खळबळ माजवली आहे. अनुषा एक उत्तम सिंगरसुद्धा आहे. अभिनेत्री अनुषा दांडेकर सोशल मीडियावर आपल्या हॉट अदांनी धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनुषा ने एक हॉट फोटो शेअर केला असून यावर चाहते घायाळ झाले आहेत. तिचा हा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर हीट ठरत आहेत. फोटोत आरशासमोर टॉपलेस असलेली अनुषा अतिशय हॉट दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज लक्षवेधी असून हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनुषा दांडेकरने हा बोल्ड फोटो शेअर करत लिहिले की, “जे तुम्हाला बोलायचे आहे ते बोला. हे माझे प्रतिबिंब आहे आणि मी त्यावर समाधानी आहे. तुम्ही स्वत:मध्ये काय बघता हे तुमचे शब्द दर्शवतात.”
अनुषाचा हा बोल्ड फोटो पाहून चाहते दंग झाले असून फोटोला चांगलीच पसंती मिळत आहे. दरम्यान, अलिकडेच अनुषाचे तिचे बॉयफ्रेंड करण कुंद्रा सोबत ब्रेकअप झालं आहे. ब्रेकअपनंतर अनुषाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात तिने करणने तिला धोका दिल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे ब्रेकअपनंतर अनुषा स्वत:वर अधिक प्रेम करु लागली असून सोशल मीडिया पोस्टमधून अनेकदा ती ‘सेल्फ लव्ह’ बद्दल भाष्य करत असते.