महाशिवरात्री हा महादेव आणि माता पार्वतीच्या विशेष पूजेचा दिवस असतो. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री येते. आज महाशिवरात्री साजरी केली जात आहे. असे मानले जाते की, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्न झाले होते.
महादेव अर्थात शंकर भगवान रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला ‘महाशिवरात्री’ असे म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. यंदा ही महाशिवरात्र 11 मार्च रोजी आली आहे. या दिवशी शंकराची पूजा करून, बेल अर्पण करुन आणि दुधाचा अभिषेक करुन त्याची पूजा करतात. यंदाही महाशिवरात्रीसाठी शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र कोरोनाच्या सावटामुळे शिवभक्तांना मर्यादा पडल्या आहेत.
या दिवशी विधिवत पूजा केली गेली तर, महादेव खूप आनंदी होतात आणि भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. जर, तुम्हीही या दिवशी महादेव-पार्वतीसाठी उपवास ठेवला असेल, तर त्यांच्या पूजेच्या वेळी इथे नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. जेणेकरून, महादेव आणि माता पार्वती प्रसन्न होतील आणि त्यांचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिवचंद्रमोळी येथे आजही महाशिवारात्रीला शिव-पार्वतीचे विधिवत लग्न लावले जाते. देवाच्या या लग्नाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांची १०० पेक्षा अधिक गावांतून शिवमंदिरात एकच गर्दी जमते. मंगलाष्टक म्हणून शिव-पार्वतीचे लग्न लावण्याची ही प्रथा शिवचंद्र मोळीवासी कित्येक वर्षांपासून जपत आहेत. अगदी पारंपरीक पद्धतीने आंतरपाठ व मंगलाष्टकांसह महादेवाचे पार्वतीशी लग्न लावणे हा या सोहळ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे.
कोरोनामुळे शिवपार्वतीचा विवाह हा कमी भाविकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने होणार आहे तसेच महाशिवरात्रीला विधिवत पूजन, महाआरतीही अत्यंत कमी भाविकांच्या उपस्थितीतच करण्यात येणार आहे. यावेळी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्देशित सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.
* एक शिवभक्त