जकार्ता : इंडोनेशियामधील जावा बेटावर पर्यटकांची बसचा भीषण अपघात झाला आहे. पर्यटकांची बस दरीत कोसळल्यामुळे तब्बल २६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३५ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथकांनं गुरुवारी ही माहिती दिली.
ही दुर्घटना नेमकी का घडली? याचा पोलीस तपास घेत आहेत. यामधील जखमी प्रवाशांची चौकशी केली असता, त्यांनी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती दिली. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस २० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघतात २६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलीस प्रमुख एको प्रासेत्यो रोब्बियांतो यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांना याबाबतची आधिक माहिती दिली. ते म्हणाले की, दुर्घटनाग्रस्त बस पश्चिम जावा बेटावरील सुबांग शहरातून इस्लामी माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या एका तुकडीला घेऊन तासिकामलय येथील एका धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी निघाले होती, त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. ते पुढे म्हणाले की, सुमेदांग जिल्ह्यातील रस्ते उंचीवर आणि दळवणळणाचे आहेत.
* १३ जणांची प्रकृती गंभीर
बचाव पथकाचे प्रमुख देदेन रिदवांसाह म्हणाले की, या गंभीर दुर्घटनेत २६ जणांचे मृतदेह आतापर्यंत मिळाले आहेत. तर जखमी असलेल्या ३५ जणांना उपचारासाठी जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये १३ जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. बचावपथकाचे काम अद्याप सुरु असून अन्य लोकांचा तपास केला जात आहे.