पुणे : राज्य सेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने पुण्यात विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला. वारंवार परिक्षा पुढे ढकलली जात असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिलीय.
14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याने पुण्यात अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. तसेच 14 मार्चलाच एमपीएससीची परीक्षा घ्यावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आज पुण्यातील नवी पेठ, शास्त्री रोड, सदाशिव पेठ येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरही सामील झाले आहेत.
गेल्या वर्षभरापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असताना आता पुन्हा एकदा 14 मार्च रोजी होणारी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पुढे ढकलून विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पुण्यातील नवी पेठ येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको सुरु केले असून ठिय्या आंदोलन केले आहे.
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक; अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. दरम्यान वारंवार परिक्षा पुढे ढकलली जात असल्याने एमपीएसची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर नवी पेठे तील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत. नवी पेठेत मोठ्या वाहतूक कोंडी झाली असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आली आहे.
पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त करत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले आहे. हे आंदोलन भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात करण्यास सुरुवात केली आहे. यात सोलापूर माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांनीही सहभाग घेतला आहे. नव्या पेठेतील रस्त्यात विद्यार्थ्यांना घेऊन पडळकरांनी ठिय्या मांडला.
पोलिसांनी या आंदोलक विद्यार्थ्यांना रस्त्यातून हटवण्यास सुरुवात केल्यानंतर प्रचंड गोंधळ सुरु झाला. कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात एमपीएससी परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. यापूर्वी 11 ऑक्टोबर 2020 रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार होती. मात्र, तेव्हाही मराठा आरक्षण प्रश्नांबाबत महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
* एमपीएससीची परीक्षा झाली पाहिजे – रोहित पवार
कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच एमपीएससीची परीक्षाही झाली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले आहे. ट्विटरवरून रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.