अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले. काल दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते.
दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली, ते 69 वर्षांचे होते. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली होती, त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर दिल्लीतच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे. मृत्यूसमयी पत्नी, दोन्ही मुले त्यांच्यासमवेत दिल्लीतच होती.
गांधी यांनी तीनवेळा नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार बनून प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीतच होते, आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दिलीप गांधी यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाजपच्या कामाला सुरुवात केली. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहराध्यक्षाची पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली. 1985 ते 1999 पर्यंत अहमदनगर नगरपालिकाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.
* भाजपने तिकीट कापल्यानंतरही पक्षाचं एकनिष्ठपणे काम करणारा नेता …!
त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला असून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. गत लोकसभा निवडणुकांवेळी भाजपाने दिलीप गांधी यांना उमेदवारी नाकारुन डॉ. सुजय विखे यांना तिकीट दिलं. मात्र, तरीही त्यांनी एकनिष्ठपणाने पक्षाचं काम केलं. सुजय विखेंच्या विजयासाठी मोलाचे प्रयत्न केले होते. दरम्यान, याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेदरम्यान बोलताना ते भावूक झाले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं अहमदनगर जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी, व्यासपीठावर बोलताना त्यांना थांबण्यास सांगितल्याने ते चांगलेच चिडले होते. नरेंद्र मोदी सभेस्थळी पोहोचण्यापूर्वी काही क्षण अगोदर ही घटना घडली. मात्र, उमेदवार डॉ. सुजय विखेंनी सर तुम्ही बोला अशी विनंती केल्यानंतर गांधी पुन्हा बोलायला लागले. पण, बोलताना त्यांचा कंट दाटला होता. मनस्वी आलेला राग गिळताना दिलीप गांधींच्या डोळे पाणावल्याचे कॅमेऱ्यात टिपले गेले. भावुक झालेल्या दिलीप गांधींची नाराजी या निमित्ताने पुन्हा एकदा नगरमध्ये चर्चेचा विषय बनली होती.
दिलीप गांधी यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी भाषण थांबविण्यास सांगितले. त्यामुळे ते भडकले. गांधी म्हणाले, दोन मिनिटात, मी 10 मिनिटे बोलतो. नाहीतर मला बोलायचं नाही, असे म्हणत ते सभेतून निघून जात होते. त्यावेळी डॉ. सुजय विखे यांनी सर तुम्ही बोला, म्हणत गांधींना भाषण सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर भाषणात दिलीप गांधी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.
दिलीप गांधी हे संघाच्या मुशीत वाढले होते, त्यामुळे भारतीय जनता पक्षावर त्यांची प्रामाणिक निष्ठा आणि प्रेम होते. त्यामुळेच, तीनवेळा खासदार एकवेळा केंद्रीयमंत्री पद मिळविल्यानंतरही पक्षाने 2019 च्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापलं. मात्र, तरीही त्यांनी एकनिष्ठ कार्यकर्ता बनून भाजपाचं काम केलं. डॉ. सुजय विखेंच्या विजयासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं.