सोलापूर : शहर पोलीस दलातील महिला पोलीस अमृता रमेश पांगरे (वय 38 वर्ष, रा. बाळे, सोलापूर) यांनी विष प्राशन करून आज बुधवारी दुपारी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
आज सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील हगलूर बसस्थानकाजवळ अमृता या बेशुध्द अवस्थेत मिळून आल्या होत्या. त्यांना नातेवाईकांनी तातडीने उपचारास दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्या मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अमृता पांगरे या जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे वाचक शाखेत कार्यरत होत्या. गेल्या चार वर्षापासून जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे कर्तव्यास होत्या. एक मुलगा, पती असा परिवार आहे. त्यांचे पती हे खाजगी कंपनीमध्ये नोकरीस आहेत.
पांगरे यांना 4 वर्ष वयाचा देवांश नावाचा मुलगा आहे. 2014 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. तर 2011 मध्ये अमृता पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या. त्यांचे वडील पोलीस खात्यात कुक म्हणून काम करत होते. तर बहिण पोलीस दलात कार्यरत आहे. बुधवारी दुपारी 12 पर्यत अमृता या पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होत्या. यानंतर त्या बाहेर पडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.
* अमृता पांगरेंच्या पतीचा आरोप
अमृता पांगरे यांच्या मृत्यूची माहिती वार्यासारखी पसरली. त्यानंतर सहकारी महिला पोलिसांनी सिव्हील हॉस्पिटल गाठले आणि दुःख व्यक्त केले. अमृता यांचा मृतदेह पाहून महिला पोलीस मैत्रिणींनी हंबरडा फोडला. पोलीस अधिकार्याशी महिला पोलिसाची मैत्री वाढली होती. याबाबत पती तसेच नातेवाईकांनी संबंधित अधिकारी आणि महिला पोलिसास समजावले होते. परंतु, त्यांची मैत्री आणखी वाढली. यातूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलेले, अशी माहिती पती धनंजय शिवाजी दाढे यांनी दिली.
मृत महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीने पत्नीचे एका पोलीस उपनिरिक्षकासोबत प्रेम संबंध असल्याचं सांगत त्या तणावातून आत्महत्या केल्याचा दावा केलाय. ते म्हणाले, “एका पोलीस उपनिरिक्षकाने माझ्या पत्नीसोबत गोड बोलून प्रेम संबंध प्रस्थापित केले. त्याबाबत आम्हाला माहिती झाल्यावर आम्ही दोघांनाही समज दिली. मात्र, हा प्रकार त्या पोलीस अधिकाऱ्याकडून थांबला नाही. त्यामुळे माझी पत्नी त्यात अडकत गेली आणि त्या पोलीस अधिकाऱ्याकडून तिला खूप त्रास होत होता. त्यातूनच पत्नीने हे पाऊल उचललं.”