बंगळुरु : कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने ध्वनी प्रदूषणाची समस्या रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला. दर्गा आणि मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावण्यास निर्बंध घालणारं परिपत्रक जारी करण्यात आलं. यानुसार, रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत दर्गा आणि मशिदीत लाऊडस्पीकर लावण्यास मनाई करण्यात आली. तसेच मशिदीच्या जवळपास फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली.
कर्नाटक वक्फ बोर्डानं राज्यातील सर्व मशिदी आणि दरग्यांमध्ये रात्री १० ते सकाळी ६ यादरम्यान लाऊडस्पीकरचा वापर न करण्याबाबत पत्रक जारी केलं आहे. लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. ९ मार्च रोजी कर्नाटक वक्फ बोर्डानं हे पत्रक जारी केलं आहे. रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. १९ डिसेंबर २०२० रोजी वक्फ बोर्डाच्या पार पडलेल्या ३२७ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वक्फ बोर्डाच्या या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या पत्रकात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारच्या दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयाचाही उल्लेख करण्यात आला आहे. जुलै २०१७ मध्ये त्या आदेशाद्वारे मशिदी आणि दरग्यांना ध्वनी प्रदुषणाशी निगडीत नियमांचंही पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
* काही मशिदींनी घेतला आक्षेप
लाऊडस्पीकरचा वापर केवळ अजान आणि आवश्यक घोषणांसाठईच करण्यात यावा. सामान्य घोषणांसाठी लाऊडस्पीकरचा वापर करण्यास मनाई असेल, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या पत्रकावर काही मशिंदींनी आक्षेप घेतला आहे. आपल्यासाठी सकाळचं नमाज पठण आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बंगळुरूच्या खतीब-ओ-इमाम मशिदीचे मकसूद इम्रान यांनी आपल्याला हे पत्रक मिळाल्याचं म्हटलं आहे. परंतु त्यांनी सकाळचं नमाज पठण महत्त्वाचं असल्याचं सांगत वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे यात बदल करण्याची मागणी केली आहे.