नांदेड : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आली. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी याची घोषणा केली. व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 11 दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असं चव्हाण यांनी आवाहन केलं.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 11 दिवसांची संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात ट्वीट करत या संचारबंदीची घोषणा केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्शिती चिंताजनक होते आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्यांसमवेत आज सकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश मी या बैठकीत दिले. pic.twitter.com/NYdWLWzETf
— Ashok Chavan (@AshokChavan1958) March 21, 2021
अशोक चव्हाण यांनी केलेल्या ट्वीटनुसार, नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होते आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्यांसमवेत रविवारी सकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत.
व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 11 दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेते आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही या ट्वीटमधून करण्यात आली आहे.