नवी दिल्ली : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली. परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पवार म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात खळबळ माजवणाऱ्या मनसुख हिरेन खून प्रकरणातील गूढ उकलले असल्याची माहिती एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी दिलेली आहे. लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिलेली आहे. यासोबतच एटीएसने याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचं परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील मेल केलं आहे.
या आरोपानंतर भाजपने अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. तर, काल राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी भाष्य केलं आहे. ‘ATS च्या तपासाची दिशा अचूक असल्याचा मला आनंद आहे. एटीएसने दोघांना अटक केली. मुख्य केस आहे अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं आणि हिरेन हत्या ही होती. मात्र, त्यावरुन लक्ष भरकटवून विरोधकांनी परमबीर सिंह यांच्या पत्राचा मुद्दा उचलून धरला. ते चुकीचं आहे,’ असं शरद पवार म्हणाले आहेत.
* पत्रकार परिषद – शरद पवार म्हणाले
“अनिल देशमुख-सचिन वाझे कथित चर्चेचा मुद्दा”
> ‘त्या’ दिवशी अनिल देशमुख रुग्णालयात होते.
> 5-15 फेब्रुवारीला देशमुख रुग्णालयात होते, त्यानंतर
15-27 फेब्रुवारी देशमुख होम क्वॉरंटाईन होते.
> आरोपच खोटा तर चौकशी कसली?
> देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही.
> सरकारच्या अस्थिरतेचा प्रश्न नाही