मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी या प्रकरणी देशमुखांची पाठराखण केलीय. यावरुन खासदार गिरीष बापटांनी शरद पवारांवर टीका केलीय.
‘एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने आरोप करणं गंभीर आहे. सरकार नालायक असून कुंपणच शेत खातंय, अशी परिस्थितीय. देशमुखांना क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’ असा टोलाही बापटांनी लगावला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केलीय. त्यावरूनच आता भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने आरोप करणं हे गंभीर आहे. हे सरकार नालायक आहे, कुंपणच शेत खायला निघालंय, अशी परिस्थिती आहे. अनिल देशमुख यांच्या सर्व क्लिप आल्यावर सगळं सत्य पुढे येईल. शरद पवार हे क्लीनचिट द्यायला न्यायाधीश नाहीत. ते काँग्रेसला लिंबू टिंबू समजतात, काँग्रेसला गृहीत धरले जात नाही, याची किंमत काँग्रेसला येत्या काळात चुकवावी लागेल. शरद पवार नेहमीच सरकार खंबीर असल्याचे सांगतात, मात्र ते या प्रकरणातून कळतंय किती खंबीर आहेत, असा टोलाही गिरीश बापट यांनी लगावला.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले गंभीर आरोप चर्चेत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यात आता परमबीर सिंग यांचे भाजप नेत्याशी नातेवाईक संबंध असल्याचेही उघड होत आहे.