नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूल (NIOS) द्वारा जानेवारी ते फेब्रुवारी 2021 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक (इयत्ता 10) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता 12) च्या सार्वजनिक परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.
एनआयओएसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन माहिती प्रसिद्ध केली आहे. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक सार्वजनिक परीक्षेचा निकाल आज जाहीर केल्याचे म्हटले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षांमध्ये भाग घेतला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी प्रथम results.nios.ac.in वर लॉग इन करावे.
यानंतर, मुख्यपृष्ठावर उपलब्ध पब्लिक एक्झामिनेशन रिझल्ट लिंकवर क्लिक करा. यानंतर नविन पेज ओपन होईल. येथे उमेदवारांनी आपला नावनोंदणी क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करुन सबमिट करावे. आता आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल. उमेदवारांनी त्यात दिलेला तपशील तपासावा. पुढील वापरासाठी ते डाऊनलोड करा आणि हार्ड कॉपी काढा.