मुंबई : मुंबईतील एका महिला शिक्षिकेच्या फुफ्फुसात कंडोम अडकल्याची माहिती समोर आली. 27 वर्षीय महिला टीबीच्या उपचारासाठी डॉक्टरकडे गेली होती. उपचारानंतर टीबीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, तिला बरे वाटत नव्हते. हा त्रास तिला 6 महिने चालला. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या छातीचा एक्स रे काढला. तेव्हा तिच्या फुफ्फुसात बॅगेसारखा प्रकार आढळला. तपासात हा कंडोमचा तुकडा असल्याचं समजलं. घटनेने डॉक्टर हैराण झाले होते.
टीबीमध्ये अनेकदा रुग्णाच्या किडनीवर परिणाम होतो. एवढंच नव्हे तर मेंदू आणि पाठीच्या कण्यावर देखीवर परिणाम होतो. टीबी झाल्यावर डॉक्टर एँटीबायोटिक औषधे देऊन रूग्णांना बरे करतात. मात्र अनेकांनी टीबी या आजारामुळे आपला जीव गमावला आहे. एका महिलेला सतत सर्दी, खोकला, ताप सारखा त्रास जाणवू लागला. हा त्रास तिला जवळपास सहा महिने चालला. तेव्हा तिला वाटलं की, आपल्याला टीबीची लागण झाली. मात्र जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिच्या फुफ्फुसात कंडोम अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
27 वर्षीय शिक्षिकेवर एंटीबायोटिक्स आणि एंटी-ट्यूबरक्लोसिस माध्यमातून उपचार केले जात होते. मात्र महिलेवर कोणताच बदल होत नव्हता. मात्र महिलेने उपचार घेणं थांबवलं नाही. आणि धक्कादायक बाब समोर आली. महिलेचा टीबी रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र तिला काही बरे वाटत नव्हते.
डॉक्टरांनी जेव्हा महिलेच्या छातीचा एक्स रे रिपोर्ट केला. तेव्हा तिच्या डाव्या फुफ्फुसाला सूज आली होती. तेव्हा सूज आलेल्या भागाची तपासणी करण्यात आली. एक बॅगेसारखा प्रकार फुफ्फुसात आढळला. त्याचा थोडाच भाग आढळून आला. तपासात हा कंडोमचा तुकडा असल्याचं समोर आलं.
27 वर्षीय महिला शिक्षिका आणि तिच्या नवऱ्याने Fellation करत असताना हा प्रकार घडला. यावेळी कंडोम अतिशय सैल पडल्याचं देखील त्यांनी म्हटलं. तसेच महिलेला तेव्हा सर्दी, खोकल्याचा त्रास देखील जाणवला. महिलेला आपण नकळत कंडोम गिळल्याचं सांगणं थोडं लाजीरवाणं वाटत होतं. त्यामुळे तिने अशी कारणं दिली.