कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीच दिवसपूर्व अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यातच आता चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपवासी झालेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यास आपली तयारी आहे आता पक्षाने काय तो निर्णय घ्यावा असे मिथून यांनी म्हटले आहे.
आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. मिथून म्हणाले की, भाजप मोठा पक्ष आहे, जर माझ्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असेल तर मी नक्कीच मुख्यमंत्री होईल. माझ्या पक्षात अनेक लोक मुख्यमंत्रीपदासाठी लायक आहेत. पण हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठ नेत्यांचा आहे असेही मिथून म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच पंतप्रधान मोदी यांने जर आदेश दिले तर आपण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार आहोत. पण मोदी असे कधीच म्हणनार नाहीत असेही मिथून म्हणाले.
मिथून म्हणाले की, भाजप मोठा पक्ष आहे, जर माझ्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असेल तर मी नक्कीच मुख्यमंत्री होईल. माझ्या पक्षात अनेक लोक मुख्यमंत्रीपदासाठी लायक आहेत. पण हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठ नेत्यांचा आहे असेही मिथून म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर आदेश दिले तर आपण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार आहोत. पण मोदी असे कधीच म्हणनार नाहीत असेही मिथून चक्रवर्ती म्हणाले आहेत.