सोलापूर / माळशिरस : माळशिरस शहरातील गर्दीचं प्रमुख ठिकाण असलेल्या माळशिरस बसस्थानकासमोरील दुकानांना रात्री आग लागली. या दुर्घटनेत दहा-बारा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळी या परिसरात आग विझवण्यासाठी हालचालींना वेग आला होता.
माळशिरस बसस्थानकसमोर विविध दुकानांची रांग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, रात्री उशीरा आगीत १२ दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यात लाखो रुपयांचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. आग विझविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरु होते. आग लक्षात घेऊन आजुबाजूच्या दुकानांतून साहित्य काढण्याचेदेखील प्रयत्न केले.
यामध्ये दुकानदारांचे लाखो रुपयांचे साहित्य जळाली असून पहाटे अग्निशामन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले जात असून आसपास ज्या दुकानदारांनी दुकानातील साहित्य बाहेर सुरक्षितस्थळी हलविले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद करण्यात आली होती. मात्र, बंद दुकानांना अचानक आग लागली. त्यात अनेक दुकाने आगीत जळून खाक झाले असून त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याबाबत आणखी अधिकृत माहिती मिळाली नाही. होळी पेटवताना लागली, की शार्टसर्किटमुळे याबाबत प्रथमदर्शी लोकांमधून तर्क लावले जात आहेत.
तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गांवकामगार तलाठी सचिन पाटील व प्रभाकर उन्हाळे यांनी पंचनामा केला आहे.जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दुकानदाराचे झालेले नुकसान यासाठी लक्ष घालून नुकसानग्रस्त दुकानदारांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी नुकसान झालेल्या दुकान मालकांनी केली आहे.
यामध्ये सर्वच दुकानांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, तरी नगरपंचायतमार्फत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त दुकानदार दत्तात्रय सपकाळ यांनी केली आहे.