मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर अनेकजण ट्विट करून त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही ट्विट केले. पवार साहेब लवकर बरे व्हा!, असं त्यांनी म्हटलं. तसेच पक्षभेदापलीकडचे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांचे ‘मार्गदर्शक’ आहात. तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ‘आधारवड’ आहात तुम्ही’, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडल्याने सोशल मीडियावरून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, लता मंगेशकर यांनी फोन करून पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान शरद पवार यांच्यावर 31 मार्चला शस्त्रक्रिया होणार आहे. पवार यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शरद पवारांवरील शस्त्रक्रिया नीट पार पाडावी यासाठी राजकीय व कला क्षेत्रातून सदिच्छा देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोनच्या माध्यमातून पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शरद पवार यांना या आजारातून लवकर बरे वाटावं यासाठी भाजप नेत्यांनीही ट्वीट केली आहे. भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर यांनीही शरद पवारांच्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.
प्रवीण दरेकर यांनी केलेल्या ट्वीटमुळं मात्र चर्चेला उधाण आलं आहे. पवार साहेब लवकर बरे व्हा! नियोजित शस्त्रक्रिया यशस्वी होऊन आपण लवकर बरे व्हावे, हीच ईश्वराकडे प्रार्थना. पक्षभेदापलीकडचे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांचे ‘मार्गदर्शक’ आहात तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ‘आधारवड’ आहात तुम्ही’ असं ट्वीट दरेकर यांनी केलं आहे.
पवार साहेब लवकर बरे व्हा !
नियोजित शस्त्रक्रिया यशस्वी होऊन आपण लवकर बरे व्हावे, हीच ईश्वराकडे प्रार्थना
पक्षभेदापलीकडचे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांचे 'मार्गदर्शक' आहात तुम्ही
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील 'आधारवड' आहात तुम्ही.
Get well soon@PawarSpeaks साहेब काळजी घ्या!— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) March 29, 2021
तर, अतुल भातखळकर यांनीही शरद पवार यांची शस्त्रक्रिया यशस्वी होवो व ते लवकरात लवकर बरे होवोत हीच इश्वर चरणी प्रार्थना, असं म्हटलं आहे.
काल रविवारी रात्री पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहे. शिवाय ३१ मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
* ‘बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवारसाहेबांचाच वडिलकीचा आधार’
शरद पवारांना पित्ताशय आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर 31 मार्चला शस्त्रक्रिया होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पवारांच्या प्रकृतीबाबत प्रार्थना केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांनंतर पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार आहे. मी मुंबादेवी, महालक्ष्मीचरणी आणि सिद्धिविनायकाचरणी प्रार्थना करते की पवारसाहेबांना लवकर बरं वाटू देत, असं त्यांनी म्हटलं.
* सर्वच दौरे 2 आठवड्यांसाठी रद्द; सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सअप स्टेटस
खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसद्वारे वडिल शरद पवार यांचे पुढील 15 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगितले. 31 मार्चपासून पुढील 10 दिवस बाबा रुग्णालयातच उपचार घेणार आहेत, त्यानंतर काही दिवस घरीच विश्रांती घेतील. त्यामुळे, त्यांचे नियोजित दौरे व विमानप्रवास सर्वकाही पुढील दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले. आपण सर्वजण समजून घेताल, त्याबद्दल आपले आभार, असेही त्या म्हणाल्या.