उमरगा : मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राम डोंगरे, बंजारा समाजाचे अध्यक्ष बाला राठोड, आनंद नगर ग्रामपंचायत सदस्य भिमराव कांबळे, माजी सदस्य राम राठोड,तानाजी राठोड, बाबु राठोड आदींसह परिसरातील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षातील एकाधिकारशाहीला कंटाळून आज बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा फटका बसला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यांच्या कर्तृत्वाचा वापर गावाच्या विकासासाठी करून मुरूम परिसरात विकासाला शाश्वत गती देऊ, असे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. सर्वांना काँग्रेसचे उपरणे देवून पक्ष प्रवेश देण्यात आले. काँग्रेसमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढला असून मागील महिनाभरात मुरूम परिसरातील शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विजयकुमार सोनवने, विकास हराळकर, मुरूम सोसायटीचे चेअरमन दत्ता चटगे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस महालिंग बाबशेट्टी, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल वाघ, मुरूम शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, दिलीप शेळके, संजय चव्हाण, संतोष पवार, विनायक पवार, तरबेज मासुलदार,चांद मुल्ला,बालाजी राठोड, अयेश राठोड, वालचंद राठोड, खिरु पवार,युवक काँग्रेसचे श्रीहरी पाटील, राजु मुल्ला,किरण गायकवाड, देवराज संगुळगे,महेश शिंदे,विकास शिंदे आदी उपस्थित होते.