मुंबई : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना रोजच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. रश्मिकाने होळीला शेअर केलेल्या फोटोंमधील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रश्मिकाच्या बोटात रिंग दिसत आहे. त्यामुळे रश्मिकाने गुपचुप साखरपुडा उरकल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, येत्या 5 एप्रिलला रश्मिकाचा 25 वा वाढदिवस आहे.
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना सध्या बरीच चर्चेत असते. अभिनेत्रीची एक झलक मिळवण्यासाठी चाहते नेहमीच वाट बघत असतात. रश्मिका देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची कोणतीही संधी सोडत नाही. ती दररोज तिचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांनाही खूप आवडतात. अलीकडे रश्मिकाचा एक फोटो व्हायरल होत आहे, मात्र हा फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अभिनेत्री रश्मिका ‘नॅशनल क्रश’ देखील ठरली होती. रश्मिकाने आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले आहे. सध्या रश्मिकाकडे चित्रपटांचीही मोठी रांग आहे. यादरम्यान रश्मिकाने तिचा असा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अलीकडेच रश्मिकाने असा एक फोटो शेअर केला आहे, की तो फोटो पाहून राष्मिकाने गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा सुरु आहे. रश्मिकाने बोटात रिंग घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वास्तविक, होळीच्या निमित्ताने रश्मिकाने सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि तिच्या इंस्टा स्टोरीवर काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर रिंग परिधान करताना दिसली. यासह, हे फोटो शेअर करताना, रश्मिकाने एक अतिशय गोड संदेश देखील लिहिला आहे, ज्यानंतर तिचा साखरपुडा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही अंगठी रश्मिकाला तिच्या चाहत्यांनी भेट म्हणून पाठवली आहे. रश्मिकाने स्वतः एक मेसेज लिहित ही बाब स्पष्ट केली आहे. येत्या 5 एप्रिल रोजी रश्मिकाचा वाढदिवस आहे आणि यावेळी तिचा 25 वा वाढदिवस असणार आहे. अशा परिस्थितीत रश्मिकाला वाढदिवसापूर्वीच ही एक खास भेट मिळाली आहे. रश्मिकाने ही रिंग एका चाहत्याने वाढदिवसाची भेट म्हणून दिल्याचे सांगितले आहे.