ताईपे : तैवानच्या वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार येथे शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला आहे. ट्रक धडकल्याने ही ट्रेन रुळावरून घसरली. या अपघात 36 जणांचा मृत्यू झाला. तर 70 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. या रेल्वेत एकूण 350 प्रवासी प्रवास करत होते. तैवानच्या पूर्व किनारी भागातील टोरोको जॉर्ज परिसरात ही दुर्घटना घडली आहे. तैवानच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रेल्वे रूळावरून एक ट्रेन घसरली.
At least 36 people have died after a train derailed on Friday in eastern Taiwan, while 72 were injured, the transport ministry said: Reuters
— ANI (@ANI) April 2, 2021
पूर्व तैवानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वे रूळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे.
या रेल्वे अपघाताच्या संदर्भातील फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियात शेअर होत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रेल्वेचे डबे रूळावरुन घसरले आहेत. तसेच रेल्वेतील प्रवाशांचे सामान इतरत्र पडलेले दिसत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
Breaking: Fire department says several feared dead and injured after a train carrying around 350 passengers derailed in a tunnel in Hualien County, Taiwan. (Video via 鄭榮貴 on Facebook) pic.twitter.com/WTyMeoXJQ1
— PM Breaking News (@PMBreakingNews) April 2, 2021
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले असून जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे