मुंबई : अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते तसेच स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलेले दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असं विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलं आहे. तर गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे गृहमंत्रीपद वळसे-पाटलांच्या गळात पडल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांची ताकदही वाढली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नवा वसुली मंत्री कोण? – चित्रा वाघ https://t.co/yXV14NR4F4
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र राज्यपालांना दिले. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असे या पत्रात म्हटले. तसेच दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात यावा, असंही त्यांनी म्हटलं.
आता गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील की हसन मुश्रीफ ? #HomeMinister #surajyadigital #सुराज्यडिजिटल #political #NCP #ठाकरेसरकार #post pic.twitter.com/5E7TkB97qf
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
दिलीप वळसे पाटील यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलाय. तशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्यामुळे अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांचं मंत्रिमंडळातील पॉवर आता अजून वाढणार आहे.
शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे – पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. आता अनिल देशमुखांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा आणि वळसे-पाटलांकडे गृहखात्याची जबाबदारी दिली जाणार असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलं आहे.
* दिलीप वळसे पाटील यांच्याविषयी
दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजी झाला. 1990 साली आंबेगाव तालुक्यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले आहेत. 2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.