मुंबई : विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रविवारी (ता. ११) एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे. परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल नाही. योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन होऊन परीक्षा पार पाडली जाणार, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मागील वर्षी कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरही झाला होता.
कोरोनाचा प्रसार थांवण्यासाठी एवढे चांगले काम तुम्ही जनते साठी करत आहात .. तर #mpsc च्या विद्यार्थ्यां चा गळ्यात कोरोना का घालत आहात? #mpsc विदयार्थी सामान्य जनते त येत नाहित ka? कृपया११ एप्रिल ची exam पुढे ढकलण्यात यावी..#postponempsc
— Chetan waghmare (@Chetan72187919) April 6, 2021
मात्र समाजमाध्यमावर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. तरी काहींनी लवकर तारीख जाहीर करा, आम्हाला या कोरोनाचे नियम पाळून ठरलेल्या एक्झाम ठिकाणी वेळेत पोहचण्यास मदत होईल, असे ट्वीट केले जात आहे.
करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय रविवारी घे तला. त्यामुळे येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परीक्षेबाबत सरकारकडून एमपीएससी प्रशासनाला कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याने, संयुक्त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार का,असा प्रश्न निर्माण झाला होता.
गृहमंत्र्यांनी घेतला पदभार, सिल्व्हर ओक बैठकीत उदयनराजे दाखल, अनेकांच्या भुवया उंचावल्या https://t.co/i0LZzrFikj
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
या परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ८२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. आता शनिवार व रविवार या दोन दिवशी लॉकडउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या परीक्षेच्या आयोजनाबाबत राज्य सरकारकडून स्पष्टता आलेली नाही, अशी माहिती एमपीएससीच्या सूत्रांनी दिली.