मुंबई : नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. याआधी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढल्या वर्गात प्रवेश देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. कोरोनाचे संकट असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार, ठाकरे सरकारचा निर्णय https://t.co/ajDg9ETHPt
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 7, 2021
कोरोनाची स्थिती राज्यात दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याआधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय होणार याबाबत अद्यापही विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत येत्या एक-दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
मास्क नाकाखाली आल्याने पोलिसांची मारहाण; व्हिडिओ व्हायरल https://t.co/E56MdmqVLh
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 7, 2021
महाराष्ट्रातील अनेक शााळांमध्ये व खेड्या-पाड्यांत संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा ऑफलाईन घ्यावी अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
madam nka game karru amjiya life sobat jashi 9 th 11 th haet na tashicha 10th ani12th che pan mula mansa haet tiyna pan corona hua saktho ek tar postpond kra NY tar online ghya exam
— piyuu (@piyuu06332577) April 7, 2021
* विद्यार्थ्यांचा सवाल, कोण जबाबदार
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन नको अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन होतात किंवा 9 वी 11 वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याबाबतचा निर्णय होतो, मग 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत परीक्षा घेण्यावर सरकार ठाम का? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही कोरोना बाधित झालो तर आमचं कुटुंब देखील कोरोना बाधित होऊ शकतं याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. ट्वीटरवर तशा प्रतिक्रिया ट्वीट होत आहेत.